सावंतवाडी पत्रकार संघाकडून स्मृतीदिनी अभिवादन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने संपादकाचार्य बाबूराव पराडकर यांच्या स्मृतिदिनी सावंतवाडीत अभिवादन करण्यात आल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पराडकर यांच्या स्मृतीस उजाळा देत अभिवादन केले. याप्रसंगी मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारका प्रमाणेच सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव पराडकर यांचे स्मारक जिल्ह्यात व्हावं, यासाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांनी प्रयत्न करावेत अस मत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने संपादकाचार्य बाबूराव पराडकर यांचा स्मृतिदिन सावंतवाडीत पार पडला.वास्तुआचार्य डॉ. प्रा. दिनेश नागवेकर यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, प्रा. रूपेश पाटील यांसह उपस्थित मान्यवरांनी संपादकाचार्य बाबूराव पराडकर यांच्या स्मृतीस उजाळा दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारका प्रमाणेच सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव पराडकर यांचे स्मारक जिल्ह्यात व्हावं, यासाठी सिंधुदुर्गातील पत्रकारांनी प्रयत्न करावेत असं मत व्यक्त केले. तर गेल्या १० वर्षातील परिस्थिती पाहता व आजची बदलती पत्रकारीता पहाता स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल अशी अवस्था आहे. पत्रकारांवर काम करत असताना असंख्य बंधन येत आहे. सडेतोड विचार मांडण्याच स्वातंत्र्य पत्रकारांना मिळत नाही. राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना, चांगले पत्रकार या क्षेत्रातून देत असलेले राजीनामे ही खरी शोकांतिका आहे. ही परिस्थिती बदलण व पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळण गरजेचं आहे अशा भावना बबन साळगावकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, बांधकाम व्यवसायिक डॉ. दिनेश नागवेकर, राष्ट्रीय पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, जिल्हा सदस्य हरिश्चंद्र पवार, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव, सत्यजित धारणकर, राजू तावडे, नरेंद्र देशपांडे, राजेश मोंडकर, विजय देसाई, दीपक गावकर, रुपेश पाटील, विनायक गांवस, शुभम धुरी, प्रशांत सावंत, आनंद धोंड, शैलेश मयेकर, भुवन नाईक, प्रसन्ना गोंदावळे आदिंसह पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांनी तर आभार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.