वेंगुर्ले दाभोलीनाका येथील मातोश्री मंडळाच्या नवदुर्गा देवीचे माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले दर्शन

वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्ले दाभोलीनाका येथील मातोश्री कला क्रीडा मंडळाच्या नवरात्रौत्सवात भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन नवदुर्गा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते. मंडळाच्या वतीने अध्यक्ष दादा कुबल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, प्रितेश राऊळ, तुषार साळगावकर, उपेंद्र तोटकेकर, भूषण सारंग, रानडे भटजी, भूषण जोशी, हितेश धुरी, हेमंत गावडे, मारूती दोडशांनटी यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.