पावशी येथील हॉटेल व्यावसायिक राजन पोखरे यांचे निधन

Google search engine
Google search engine

कुडाळ । प्रतिनिधी : पावशी बोरभाट येथील रहिवासी राजन अर्जुन पोखरे (६२) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते हॉटेल व्यावसायिक होते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सदैव हसमुख व मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. त्यांचा मित्रपरिवारही फार मोठा होता. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे पावशी परिसरात शोक व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी, जावई, दोन भाऊ, वहिनी, पुतणे, पुतण्या, तीन बहिणी, भावोजी, भाचे असा मोठा परिवार आहे. पावशी बोटभाट येथील संजय पोखरे व शेखर पोखरे यांचे ते बंधू होत.