सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि तेच कोकण निसर्गरम्य असण्याचे गमक आहे. पण याच जिल्ह्यातील रेडी गावात शेकडो फूट खोदाई होणारे मायनींग आणि त्यामुळे हवेत पसरणाऱ्या कणांचा प्रादुर्भाव पाण्याच्या स्रोतात सापडतो आणि त्यामुळे उद्भवणारी रोगराई आणि आजार यांपासून रेडी गावाला मुक्तता मिळावी यासाठी ‘नॅब समृद्धी फायनान्स ‘ या कंपनीच्या सहकार्याने ‘कोकण संस्थे ‘ने येथील वॉटर एटीएमचे लोकार्पण केले. रेडी ग्रामपंचायत येथे झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर (पाणी व स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग) यांनी फित कापून उद्घाटन केले यावेळी माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडीचे माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत , रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच सौ.नमिता नागोळकर, कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल आदी उपस्थित होते.
बऱ्याचदा दुष्काळी भागात जेवढा पाण्याचा बिकट प्रश्न असतो तसा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात असू शकत नाही अशी धारणा जन माणसांची असते आणि ती तत्त्वतः खरी आहे पण कोकणातील काही गावात पाण्याची समस्या आहे आणि ती म्हणजे शुद्ध पाण्याची. गावाला स्वच्छ पाणी मिळवून देण्यासाठी नॅब समृद्धी फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपल्या सी एस आर निधीतून या गावात वॉटर एटीएम आणि पाणी स्वच्छता सयंत्र देऊन मदतीचा हात दिला. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेडी गाव आणि विभागातील २० हजाराहून अधिक लोकांना याचा लाभ होणार असून लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कोकण संस्थेचे अजिंक्य शिंदे, अवंती गवस, समीर शिर्के, भावना साटम, प्रदीप पवार, हनुमंत गवस शशिकांत कासले बाळकृष्ण शेळके, कुणाल चव्हाण यांनी मदत केली.
आजी – माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथमेश सावंत यांनी तर आभार अजिंक्य शिंदे यांनी मानले.
असा साजरा व्हावा वाढदिवस
बरेच जण वेगवेगळ्या मार्गाने लाखो रुपये खर्च करून साजरे करतात पण असे वाढदिवस लोकांच्या दोन – पाच दिवस स्मरणात राहतात पण कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल हे दरवर्षी आपला वाढदिवस समाजाभिमुख कार्यक्रम करून साजरा करतात.