वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी ते रत्नागिरी अशी एसटी फेरी सुरु करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ नागप यांनी विभाग नियंञक रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या लांजा आगारातील भुईबावडा ते रत्नागिरी एस.टी.बस सुरु आहे. भुईबावडा येथुन सकाळी ७ वा. सुटणारी ही बस पाचल मार्गे रत्नागिरी अशी जाते. तर पुन्हा सायंकाळी ७ वा.भुईबावडा येथे वस्तीला येते. या गाडीमुळे या मार्गावरील प्रवाशी व विदयार्थी यांची चांगली सोय झाली आहे. हीच बस वैभववाडी ते रत्नागिरी अशी केल्यास त्याचा फायदा संपूर्ण वैभववाडी तालुक्यातील प्रवाशांना पाचल, रत्नागिरी येथे जाण्यासाठी होणार आहे. सकाळी ७ वा.भुईबावडा येथून सुटून भुईबावडा, पाचल मार्गे रत्नागिरी व सायंकाळी पुन्हा याच मार्गे राञी वस्तीला येईल. याचा लाभ या मार्गावरील प्रवाशांना होणार आहे. या मार्गावर अशी बस नसल्यामुळे प्रवाशांना दामदुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याचा विचार करुन वैभववाडी रत्नागिरी बस सुरु करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे नागप यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन रत्नागिरी विभाग यांच्याकडे केली आहे.