मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गडगघेरावाडी येथील रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विजय शंकर दूखंडे (७८ वर्ष) यांचे नुकतेच ठाणे येथे निधन झाले. ठाणे येथील स्मशानभूमीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई परेल येथे लोकल आर्म युनिटमध्ये त्यांनी आपल्या सेवेचा प्रारंभ केला होता यानंतर मोटरसायकल चालवण्याचे त्यांचे नैपुण्य पाहून नागपाडा वाहतूक शाखेमध्ये काम करत असताना त्यांना मोटर बाईक इन्स्ट्रक्टर म्हणून नेमणूक झाली नामचीन गुंड पोत्या दादा याला अटक करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्यांनी सांताक्रुज पोलीस स्टेशन येथे बजावल्याने कमिशनर ऑफ पोलीस यांच्याकडून त्यांच्या नावाची राष्ट्रपती पदकासाठी शिफारस झाली होती व त्यानंतर त्यांना तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक दिल्ली येथे बाल करण्यात आले होते अनेक गँगस्टर वर कारवाई त्यांचा सहभाग असायचा बीपी रोड पोलीस स्टेशन येथे १.४ करोडच्या मनाली ज्वेलर्स रॉबरी प्रकरणांमध्ये थेट पश्चिम बंगाल येथे जाऊन त्यांनी आरोपी मुंबई पोलीस दलामध्ये मास्तर या टोपण नावाने त्यांची ओळख होती.
मसुरे येथील सामाजिक क्षेत्रात विजय दुखंडे यांचे मोठे नाव होते. गावातील धार्मिक उत्सवात ते सहभागी असायचे. अनेक मंदिरांना, गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी शैक्षणिक निधी त्यांनी दिला होता. गावातील कला, क्रीडा,धार्मिक, सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहून सर्वांच्या पाठीशी दिलदारपणे विजय दुखंडे राहत होते. क्रीडा स्पर्धा भरवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. मसुरे गावात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही दिवस पान विक्रीचा व्यवसाय केला होता. अतिशय खडतर परिस्थितीत बोटीने त्यांनी मुंबई गाठून काही वर्ष मील मध्ये सुद्धा नोकरी केली होती. यानंतर त्यांनी पोलीस दलात नोकरी करताना पोलीस दलाचे, महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.अनेक गुन्ह्यांचा त्यांनी छडा देशभर फिरून लावला होता. त्या काळात वेश पालटून गुन्हेगारांचा छडा लावण्यात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्यांचा नंबर वन होता. पोहणे,धावणे या मध्ये सुद्धा त्यांचे नैपुण्य होते. परोपकारी आणि हसतमुख स्वभाव असल्यामुळे सर्व मसुरे ग्रामस्थांच्या हृदयामध्ये त्यांनी एक आधाराचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, भाऊ, नातवंडे, पुतणे, पुतणी, असा मोठा परिवार असून येथील युवा व्यवसायिक विनायक उर्फ बाबू दुखंडे, स्मिता राणे, कुसुम राऊत यांचे ते वडील, उद्योजक बाळा दुखंडे यांचे बंधू आणि मसूरे येथील रिक्षा व्यवसायिक महेश दूखंडे, मुख्याध्यापक किसन दूखंडे यांचे ते काका तर युवा सामाजिक कार्यकर्ते रोशन दूखंडे यांचे ते आजोबा होत.