डॉक्टरांची क्रिकेट ट्रॉफी : कणकवली चा महिला डॉक्टर संघ विजेता

कणकवली (प्रतिनिधी)

सावंतवाडी मेडिकल असोसिएशन आणि डॉक्टर l फ्रॉटर्नीटी क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेटचा छंद जपण्यासाठी डॉक्टरांसाठी नुकतेच बोर्डिंग ग्राउंड मालवण येथे क्रिकेट च्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांच्या झालेल्या या क्रिकेट सामन्यात कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, मालवण महिला संघ सहभागी झाले होते. ४ संघांमध्ये साखळी पद्धतीने झालेल्या लढतीत महिलांच्या क्रिकेट सामन्यात कणकवली तर पुरुषांमध्ये झालेल्या ८ सामन्यात मालवणचा संघ विजेता ठरला.
महिला डॉक्टरांच्या कणकवली आणि सावंतवाडी संघात अंतिम लढत झाली या झालेल्या चुरशीच्या सामन्यात अंतिम लढत ही कणकवली आणि सावंतवाडी संघात झाली. कणकवली महिला संघ प्रथम फलंदाजी करत ४२/५ धावांचे आव्हान ठेवले होते. सावंतवाडी संघ शेवटपर्यंत झुंज देत
असताना अंतिम चेंडूवर कणकवली संघ विजेता ठरला. सावंतवाडी संघाने ४०/२ अशी धावसंख्येपर्यंत मजल मारली. कणकवली संघाच्या डॉ. हेमा तायशेटे या उत्कृष्ट फलंदाज तर डॉ. पुष्पलता सावळ उत्कृष्ट गोलंदाज तर डॉ. भक्ती सावंत या मालिकावीर ठरल्या.