मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शाळा सुरक्षा अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार शाळा सुरक्षा अंतर्गत सर्व शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन संदर्भात रंगीत तालीम आयोजित करणे बाबत परिपत्रक प्राप्त झाले. या परिपत्रकानुसार मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे आपत्ती व्यवस्थापन संबंधित रंगीत तालीम शाळास्तरावर घेण्यात आली. रंगीत तालीम सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेत शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना उचित सूचना देण्यात आल्या. प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार सर्व शिक्षकांना नियोजित ठिकाणी नियुक्त करण्यात आले तसेच प्रत्येक वर्गासाठी एका शिक्षकाची निरीक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी सुरक्षितपणे वर्गाच्या बाहेर पडतील याचीही पूर्ण दक्षता घेण्यात आली.

शाळेतील दिव्यांग मुलांची रंगीत तालीम घेताना विशेष दक्षता घेण्यात आली. रंगीत तालीम घेण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना यांनी सर्व शिक्षकांना या विषयास अनुसरून योग्य ते मार्गदर्शन व सूचना देत शाळेतील रंगीत तालीम पूर्णपणे सुरक्षित व शिस्तबद्ध होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिला. यावेळी अन्य सहकार्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन सावंतवाडी चे पोलीस उपनिरीक्षक श्री .अमित गोते, पोलीस हवालदार श्री. महेश जाधव श्री. धनंजय नाईक श्री. महेश निरवडेकर व कॉन्स्टेबल श्री. निलेश सावंत यांचे सहकार्य लाभले. तसेच आरोग्य विभाग, 108 रुग्णवाहिका सेवा यांच्यावतीने वैद्यकीय अधीक्षक श्री. ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर , डी.एम.ओ .श्री. दीपक लादे यांचे तर सावंतवाडी नगर परिषदेच्या अग्निशमन सेवेचे श्री. नंदकिशोर गावकर यांचेही यावेळी मोलाचे सहकार्य लाभले .
या उपक्रमात सावंतवाडीतील सर्व पत्रकार ,शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक- पालक संघ व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अन्य पालक तसेच विद्यार्थी यांचेही सहकार्य लाभले. तसेच प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री आर. व्ही मोरे , सौ शेरॉन अल्फान्सो , श्री स्वप्नील गोरे ,श्री.विजय इलकर व अनिता सडविलकर /गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्वांनी केलेल्या सहकार्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक रे.फादर रिचर्ड सालदाना पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.