कणकवली (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली च्या कार्यालयात राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उप कार्यकारी अभियंता के.के.प्रभू, लेखापाल विजेंदर सिंग, अभियंता वर्षाराणी सूर्यवंशी, अभियंता संजीवनी थोरात, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रथम राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागात थोर पुरुषांची जयंती साजरी होणे आणि त्यांच्या विचारांची देवानघेवाण करण्याचा पायंडा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी घातला आहे.