पाल्य आणि पालकांना शैक्षणिक सजगता एकाच व्यासपीठावर मिळवून देणारे विविध कोर्स संपन्न
संस्थाचालक आणि विद्यार्थी- पालकांचा सकारात्मक प्रतिसाद ! मात्र सातत्य राखण्याची आवश्यकता
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — आपल्या सर्वांच्या शरीरातील हृदय हा महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाचा उत्सव म्हणजेच हृदयोत्सव ! तो जर आपण आपल्या मनाने रोज प्रामाणिकपणे अनुभवला तर आनंदी जीवनात,तणावमुक्त राहण्यास त्याचा उपयोग होतो. यशस्वी होतो.हेच सूत्र साधून हार्ट फुलनेस एज्युकेशन ट्रस्ट तर्फे विद्यार्थी साठी वेगवेगळे कोर्स शिकवले जातात. यामध्ये आजच्या मुलांना तणाव मुक्त जीवन जगण्याची क्लुप्ती, सामूहिक ज्ञान साधनेतून सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखविला जातो. आणि जीवनशैलीमध्ये परिवर्तन होऊन काळजी रहित आनंदी कसे राहावे याचे मार्गदर्शन लाभते. व्यक्तिमत्व विकास होऊन धैर्याने आत्मविश्वासाने मुलं परीक्षेत सामोरे जातात. वेगवेगळ्या कोर्स मधून त्यांना सजग केले जाते. यासाठी एक सेमिनार न घेता, त्यामध्ये सातत्य-सराव- साधना राखणे अत्यावश्यक आहे. असे मत ट्रस्टच्या डॉक्टर मानसी बापट यांनी सेमिनार निरोपप्रसंगी व्यक्त केले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी आणि हार्ट फुलनेस एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने तीन दिवसांचे हृदयोत्सव सेमिनार घेण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या मुला- मुलींनी- पालक- शिक्षक यांनी यात भाग घेतला. यावेळी प्रेरणादायी सौ. मानसी माजगावकर यांनी या विषयाची, सेमिनारची सर्वांना गरज वाटली पाहिजे,याचे महत्त्व विशद करताना ट्रस्ट चे सातत्य- मार्गदर्शन सदैव लाभेल असे सुचित केले. ट्रस्टचे डॉक्टर गोपाल, डॉक्टर सयाजी गायकवाड,अभिजीत खांडेकर, शुभम बाहेकर, श्वेता खाडे,प्रियंका, त्रिवेणी यांनीही ट्रस्टच्या माध्यमातून स्वतःच्या करिअरला मिळालेला आकार, याची उदाहरणे देताना या उपक्रमाची उपयुक्तता स्पष्ट केली. यावेळी ट्रस्टच्या सर्वांचं आभार मानण्यात आले. संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत यांचे सह पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, सौ. सायली सावंत- उभयता उपस्थित होते. संस्थेतर्फे रंजन नेरूरकर यांनी ट्रस्टच्या सर्व उपक्रमांना पालक-शिक्षक आणि पाल्य यांचे कडून नियमित सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले…..