तोंडवळी फाटा वायंगणी येथे ६५ ब्रास वाळू साठा जप्त

Google search engine
Google search engine

मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची धडक कारवाई

मालवण | प्रतिनिधी : अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक यावर मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील महसूल पथकाने धडक कारवाई सुरू ठेवली आहे. गुरुवारी सायंकाळी वायंगणी (तोंडवळी फाटा येथून आतील मार्गावर) सुमारे ६५ ब्रास अनधिकृत उत्खनन करून ठेवलेला वाळू साठा सील करत जप्त केला आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार गंगाराम कोकरे व महसूल पथक यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

५ जानेवारी रोजी आंबेरी सडा याठिकाणी अश्याच पद्धतीने कारवाई करत सुमारे १ हजार ब्रास वाळू साठा सील करण्यात आला होता. सोबतच अनधिकृत वाळू वाहतूक वरही धडक कारवाई सुरू असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

वायंगणी येथे तीन ठिकाणी ढीग करून वाळू साठा ठेवण्यात आला होता. तर काही वाळू साठा नेण्यात आल्याचेही दिसून येत होते. याबाबत जमीन मालक व संबंधीत यांना नोटीस देऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी माहिती देताना सांगितले.