मळेवाड येथे अपघातात रशियन पर्यटक जखमी

Google search engine
Google search engine

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शिरोडा मार्गावर मळेवाड जकातनाका येथे दुचाकी घसरून परदेशी पर्यटक अँलेक्स ( मूळ रा.रशिया) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातग्रस्त विदेशी पर्यटकाला विश्वास चराटकर, प्रसाद राऊत, मनीष केरकर, सुमेश शिंदे या युवकांनी सहकार्य केले.