सिंधुदुर्ग | ग्रा.पं. निवडणूकीमधील निवडणूक खर्च उमेदवारांनी सादर करावा, अन्यथा अपात्रतेची कारवाई

Google search engine
Google search engine

“हि” आहे शेवटची तारीख 

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. तरी संबंधित उमेदवारांनी दि. २० जानेवारी २०२३ पर्यंत खर्चाचा हिशोब सादर करावा,असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर रोजी ३२५ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी लावण्यात आला. ही निवडणूक ५ हजार ३३४ उमेदवारांनी लढवली आहे.