आगाशे विद्यामंदिरात आयोजन
रत्नागिरी : येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवाची सांगता झाली. या निमित्त आयोजित नाट्यछटा स्पर्धेत इयत्ता पहिलीत सार्थक ढवळ, दुसरीत रिया काजरेकर, तिसरीत सोहम भागवत आणि चौथीमध्ये आभा घारपुरे यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
इयत्ता पहिलीमध्ये द्वितीय दुर्वा बंडबे, तृतीय मैत्रेयी नागवेकर, उत्तेजनार्थ गंधर्व पाध्ये, सिया मोरे यांनी, इयत्ता दुसरीत द्वितीय शांभवी सनगरे, तृतीय विभागून मुक्ता पळसुलेदेसाई व स्वरा शेट्ये, उत्तेजनार्थ श्रीपाद भिडे, ज्ञानेश काळे आणि उत्तम वेशभूषेसाठी अंशिका निकंबे हिला बक्षीस दिले. इयत्ता तिसरीत द्वितीय वर्धन बेहेरे, तृतीय शौनक गोखले व स्मित कदम यांना विभागून आणि उत्तेजनार्थ श्रेया चव्हाण व स्वरा आठल्ये यांना बक्षीस मिळाले. इयत्ता चौथीमध्ये द्वितीय वल्लरी मुकादम, तृतीय त्रिशा नेवरेकर आणि उत्तेजनार्थ दुर्वा चव्हाण, स्पृहा वायंगणकर यांनी यश मिळवले. यंदा पहिल्यांदा प्रथम विजेत्यांना फिरता चषक देण्यात आला. नाट्यछटा स्पर्धेसाठी अभिनेता स्वानंद देसाई आणि अभिनेत्री रमा रानडे यांनी परीक्षण केले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर, भारत शिक्षण मंडळ कार्यकारी मंडळ सदस्य धनेश रायकर, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शिंदे, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, आरती साळवी, सुधीर शिंदे, स्मिता शिंदे, सर्व शिक्षिका उपस्थित होते. शारदोत्सवामध्ये हभप प्रवीण मुळ्ये यांचे सुश्राव्य कीर्तन, विविध गुणदर्शन कार्यक्रम, दररोज आरती असे कार्यक्रम साजरे झाले. पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक संघाने या कार्यक्रमांसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या कार्यक्रमाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर व संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
भरडधान्य पाककृती स्पर्धा
पालकांसाठी भरडधान्य पाककृती स्पर्धा आयोजित केली. यात २९ महिला पालकांनी व ४ आजींनीही सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम श्रावणी पेढे व सई देशमुख यांना विभागून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय सृष्टी चव्हाण, तृतीय शीतल मोरे, उत्तेजनार्थ क्रमांक वर्षा जोशी, श्रावणी पाध्ये व राधिका आठल्ये यांना मिळाले. या स्पर्धेसाठी समिता शेट्ये, अनुजा आगाशे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.