केळुस येथे १५ जानेवारीला भव्य रोजगार मेळावा

नामांकित कंपन्यांकडून तरुणांना नोकरीच्या संधी

वेंगुर्ला: प्रतिनिधी
केळुस ग्रामहितवर्धक मंडळ मुंबई व अरविंद रमाकांत प्रभू मित्रमंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील केळुस येथे १५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.येथील तारादेवी मंदिर या ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत हा रोजगार मेळावा होणार असून यात शिकाऊ प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत विविध नामांकित कंपन्यांकडून तरुण-तरुणींना नोकरीवर प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यासाठी एसएससी, एचएससी, आयटीआय चे सर्व ट्रेड, डिप्लोमा इंजीनियरिंग, बीएससी, बीसीए, एमसीए, बीई, बी टेक, बीएससी, मायक्रोबायोलॉजी, एमएससी व इतर शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आल्या आहेत. या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्यांची वयोमर्यादा १८ ते ३५ पर्यंत राहणार आहे. तर यामध्ये निवड होणाऱ्यांना दरमहा १० ते १५ हजार पासून पगार उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या धोरणानुसार कॅन्टीन व वाहतूक सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे तरुण तरुणींनी आधार कार्ड/पॅनकार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व पासपोर्ट फोटो ६ या कागदपत्रासहित या मेळाव्यात सहभाग व्हावें.तरी या रोजगार मेळाव्याचा लाभ तरुणांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.