रत्नागिरी l प्रस्तावित उद्योग भवन इमारतीचे भूमीपूजन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा उद्योग केंद्र आवारामध्ये होणार आहे.*
तसेच उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांच्या महाव्यवस्थापकांची परिषद रविवार 29 ऑक्टोबर व सोमवार 30 ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते हॉटेल सावंत पॅलेस, टीआरपी येथे होणार आहे. असे जिल्हा उद्योग केंद्रांच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी कळविले आहे.