आंब्यावर फवारणीचे औषध शरीरात गेलेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू

Google search engine
Google search engine

 

मालवण | प्रतिनिधी : आंब्याच्या झाडावर फवारण्याचे औषध अनावधानाने पोटात गेल्याने प्रकृती अस्वस्थ बनलेल्या नांदरुख येथील सतरा वर्षीय युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे . याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली.

याप्रकरणी मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी नांदरुख येथील एक युवती हात पाय धुण्यासाठी बाथरूम मध्ये गेल्यानंतर बादलीमध्ये ओतून ठेवलेले आंब्यावर फवारणी करण्याच्या औषधाने चुकीने तिने तोंड धुतले. औषध तिच्या शरीरात जाऊन तिची प्रकृती बिघडली होती. अधिक उपचारासाठी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र गुरुवारी तिचे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबतची खबर ओरोस पोलीस स्थानकात दिल्यानंतर आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. हे प्रकरण ओरोस पोलिसांकडून मालवण पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.