महाकाल तीर्थक्षेत्राच्या लोकार्पण प्रसंगी सायन येथे महाआरती,आ.नितेश राणे यांचा सहभाग

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, यांची उपस्थिती

संतोष राऊळ  | कणकवली 

उज्जैन येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री देव महाकाल तीर्थक्षेत्राच्या कॅरीडोरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुंबई सायन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पार्वती-शिव-भवानी मंदिरात महाआरती करण्यात आली.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आणि भाजपचे आमदार,नेते,पदाधिकाऱ्यांसमवेत कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांनी या महाआरती सोहळ्यात सहभाग घेतला

.यावेळी आमदार प्रसाद लाड,आमदार कॅप्टन तामिल सेलवन, माजी मंत्री कृपाशंकर सिंग,सायन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आदी उपस्थित होते.दरम्यान उज्जैन येथील लोकार्पण सोहळ्याचे मुंबई सायन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.