आचरा वरचीवाडी येथील युवक बेपत्ता

आचरा | प्रतिनिधी : आचरा येथील गणेश शामा निकम वय 19 युवक राहत्या घरातून 24 आक्टोबरच्या रात्री ते 25 आक्टोबरच्या सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान कोणालाही न सांगता बेपत्ता झाला आहे. याबाबतची फिर्याद राजेश भोसले यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे. गणेश हा कातकरी समाजाचा युवक लहानपणा पासून आचरा वरचीवाडी येथील राजेश भोसले यांच्याकडे वास्तव्यास होता.

दि 24 रोजी गणेश हा युवक रात्री नित्यानियमाप्रमाणे झोपण्यास गेला मात्र 25 तारिखला सकाळी तो त्याच्या जागेवर दिसून न आला नाही. त्याची गावात, इतर ठिकाणी शोधाशोध  चालू केली. मात्र कुठेही आढळून न आल्याने राजेश भोसले यांनी आचरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद 26 रोजी दिली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुदेश तांबे करत आहेत. हा युवक कुठेही दिसून आल्यास आचरा पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन आचरा पोलीसांनी केले आहे.