मराठा मंडळाचा आज वर्धापन दिन

चिपळूण (वार्ताहर) : मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचा ४५ वा वर्धापन दिन शनिवार दि. २८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण पूजा तर सायंकाळी ५ वाजता वर्धापन दिन समारंभ होणार आहे. यावेळी मराठा मंडळ मुलुंड कलामंच प्रस्तुत ‘ हॆ सुरांनो चंद्र व्हा ‘ हा हिंदी-मराठी गाणी आणि नृत्यांचा बहारदार कार्यक्रम होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रमेश शिर्के, कार्याध्यक्ष महेश चव्हाण, सरचिटणीस अजय खामकर यांनी कळवले आहे.