शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
लांजा( प्रतिनिधी) भाजपाच्या नेत्या तथा लांजा-राजापूर विधानसभा निवडणुक सहप्रमुख उल्का विश्वासराव यांनी साटवली गांगोवाडी येथे भेट दिली. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शासनाच्या शेतीविषयक विविध योजना बाबत मार्गदर्शन केले.
उल्का विश्वासराव यांनी साटवली गांगोवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीविषयक मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना पीएम किसान योजने संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शेती विषयक योजनांचा लाभ घेऊन व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून क्रांती घडवावी, शेतीवर आधारित उद्योग करून स्वयंपूर्ण व्हावे असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
यावेळी भाजपाचे लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, महिला तालुका अध्यक्ष परिणीती सावंत, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष अबिद काजी तसेच जितेंद्र चव्हाण, असलम काजी, अब्दुल कादिर वणू, शिवाजी पराडकर ,मारुती अपकरे ,बुवा गोपाळे, परशुराम तरळ, राजेंद्र वीर, चिंतामणी सावंत, अविनाश पावस्कर ,अकबर रखांगी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.