वेंगुर्ले : प्रतिनिधी :वर्ल्ड पोलियो डे निमित्त रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन तर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
जगातून पोलियो चे समूळ उच्चाटन करण्यात रोटरी इंटरनॅशनल ने सिंहाचा वाटा उचललेला आहे.पोलियो लस निर्मिती साठी लागणारा खर्चाचा फार मोठा भाग रोटरी इंटरनॅशनल पुरवते.त्याचाच एक भाग म्हणून आज वर्ल्ड पोलियो डे चे औचित्य साधून पोलियो च्या लस देण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार आज रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन च्या वतीने करण्यात आला.यामध्ये ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला,प्राथमिक आरोग्य केंद्र आडेली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस इथे भेट देऊन तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रोटरी क्लब वेंगुर्ला चे अध्यक्ष राजू वजराटकर,सचिव योगेश नाईक,उपाध्यक्ष प्रथमेश नाईक,ट्रेजरर पंकज शिरसाट,पोलियो प्लस चेअरमन सदाशिव भेंडवडे,इव्हेंट चेअरमन वसंतराव पाटोळे,स्पोर्ट्स चेअरमन मुकुल सातार्डेकर आदी उपस्थित होते