सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन
राज्यभरातील आठ विभागीय संघांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणली. भविष्यात तंत्रज्ञानयुक्त युवा पिढीची जगाला गरज आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी जगाचे नेतृत्व करणार आहे. तुम्हा मुलांमध्ये ती ताकद नक्कीच आहे. त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करणं हे आपलं कर्तव्य असून मुलांनी विज्ञान व तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घ्या व जगाचे नेतृत्व करा, असा सल्ला राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
दरम्यान, विज्ञान हा आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. मात्र, महाराष्ट्रातील मुलं ही नेहमी विज्ञान गणित व भाषा या विषयांमध्ये कमी पडताना दिसतात. त्यामुळे या विषयांमध्ये मुलांची प्रगती व्हावी यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे नेहरू विज्ञान केंद्र, वरळी, मुंबई राज्य विज्ञान शिक्षण संस्था
प्रादेशिक विद्या प्रशिक्षण, रविनगर, नागपूर
विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग आणि कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपला देश जगात बलशाली देश आहे. त्यामुळे जगात कोणाचीही आपल्याकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत नाही. उलट जगालाच आपल्याकडील युवा पिढीची गरज आहे. जर्मनी सारख्या देशात आज चार लाख युवकांची गरज आहे. त्यामुळे पुढील काळात येथील मुलांना जर्मन भाषा शिकविली जाईल. आमचे त्यासाठी प्रयत्न आहेत मात्र शिक्षक व विद्यार्थ्यांनीही त्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
राज्यातील शालेय शिक्षण योग्य प्रतीचे व दर्जाचे व्हावे यासाठी अलीकडेच मी ‘एक्सपर्ट कमिटी ‘ नेमली आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगल्या आरोग्याची ही गरज आहे. यासाठीच शाळांमधून दिलं जाणारं ‘मिड डे मिल’ अर्थात ‘मध्यान्न भोजन ‘ हे चविष्ट असण्याबरोबरच ते पौष्टिक व चांगल्या दर्जाचे असण्यासाठीही आमचे प्रयत्न आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या शिक्षणात व आताच्या शिक्षणात आमुलाग्र बदल झाला आहे. आता व्यवसायिक शिक्षणाकडे जास्त कल आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणाची गरज आहे. कुटुंब सांभाळण्यासाठी नोकरी वा व्यवसायाची गरज असते. त्यामुळे आपल्या जीवनाकडे बघताना कोणतेही काम कमी न मानता आपल्या व आपल्या कुटुंबाच्या प्रगती बरोबरच देशाचीही प्रगती साधण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.