हाॅलीबाॅल स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट ओंकार गोसावी याचा सत्कार

वेंगुर्ले : प्रतिनिधी
हाॅलीबाॅल स्पर्धेत नॅशनल स्तरावर गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल कु ओंकार अनंत गोसावी याचा वेतोरे येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सन्मान करताना पालकरवाडी सरपंच श्री. बंड्या पाटील, बाळासाहेबांची शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख श्री नितीन मांजरेकर तसेच श्री गजानन बांदिवडेकर, श्री गुरू वराडकर, श्री राजा पावसकर, श्री विकास अणसुरकर, श्री जया वराडकर, श्री दिपक नाईक, आदि मान्यवर उपस्थित होते.