बांदा : प्रविण परब l कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघ प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांचे महाराष्ट्र -गोवा सीमेवर बांदा येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. ‘निलेश राणे साहेब आगे बढो, हम आपजे साथ है’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हमारा नेता कैसा हो, निलेश साहब जैसा हो’ च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, सभापती प्रमोद कामत, राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, शर्वाणी गावकर, उन्नती धुरी, जिल्हा बँक संचालक बाबा परब, रवी मडगावकर, माजी पं. स. सभापती मानसी धुरी, शीतल राऊळ, आनंद शिरवलकर, शेखर गावकर, मोहिनी मडगावकर, कुडाळचे माजी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक विलास कुडाळकर, प्राजक्ता शिरवलकर, विजय सावंत, योगेश घाडी, रोणापाल उपसरपंच कृष्णा परब, माजी सरपंच उदय देऊलकर, किनळे सरपंच दीपक नाईक, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रा. पं. सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, शाम मांजरेकर, मकरंद तोरसकर, मधुकर देसाई, आत्माराम गावडे, मडुरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, साई धारगळकर, हुसेन मकानदार, साहिल कल्याणकर, वैभववाडीचे दीपक नारकर, साई सावंत, अभि गावडे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोंच्या सहाय्याने उपस्थित होते.