दापोली | प्रतिनिधी : महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा.काणे स्मारकाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 14 जानेवारी 2023 पासून वाचक कट्ट्याचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. हा वाचक कट्टा महिन्याच्या दुस-या शनिवारी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत असेल.दापोली तालुक्यातील वाचकांच्या वाचक कट्ट्याचे आयोजन 14 जानेवारी शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा.काणे स्मारक जलगाव तालुका दापोली (ग्रामपंचायत जालगाव समोर अपना स्वीट्स इमारत) या ठिकाणी करण्यात आले आहे तर खेड येथे महामहोपाध्याय भारतरत्न पां.वा.काणे स्मारक आणि कोमसाप शाखा खेड येथे समितीचे कार्याध्यक्ष विमलकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पूज्य साने गुरूजी स्मारक वडघर माणगाव येथे समितीचे उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते यांच्या मार्गद्रशनाखाली आयोजित करण्यात आले आहे.या वाचक कट्ट्यावर वाचकांनी आवर्जून उपस्थित होऊन आपण वाचलेल्या पुस्तक,कविता, स्फूट किंवा कोणत्याही वर्तमानपत्रातील मजकुरावर अराजकीय भाष्य करू शकतात. या विशेष कार्यक्रमाला तमाम वाचकांना या निमित्ताने आवर्जून उपस्थित रहाण्याचे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी केले आहे.