माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन ची विद्यार्थिनी कुमारी समता सुनील जाधव हिला मानाचा समजला जाणारा एस वाय गोडबोले तथा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ रोजी चिपळूण च्या युनायटेड इंग्लिश स्कूल च्या गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.हा पुरस्कार सिने नाट्य सृष्टीतील ख्यातकिर्त अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते दिला जाणार आहे.रोख रक्कम,सन्मानचिन्ह,कौतुक पत्र व पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समता ही माखजन इंग्लिश स्कूल मधील हुशार मुलगी असून वक्तृत्व स्पर्धांमध्ये तीने अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
शिक्षण क्षेत्रात,विशेषतः कोकण विभागात प्रतिष्ठेचा आणि मानाचा मानला जाणारा पुरस्कार समता ला जाहीर झाल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री आनंद साठे,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर आदिंसह अन्य संचालक यांचे कडून समताचे कौतुक होत आहे.तर परिसरातून समतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













