अणसुर गावातील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा

सरपंच व ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची भेट घेऊन केली मागणी

वेंगुर्ले : प्रतिनिधी
अणसुर गावातील रस्ता डांबरीकरण, संरक्षक भिंत यासह विविध विकास कामांना निधी मिळावा अशी मागणी नवनिर्वाचित सरपंच सत्यविजय गावडे यांच्यासह उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ओरोस येथे अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सुधाकर गावडे, प्रज्ञा गावडे, तसेच संदेश गावडे, भाजपा तालुका कार्यकारणी सदस्य आनंद उर्फ बिट्टू गावडे, खरेदी विक्री संघ संचालक महादेव गावडे, तसेच देऊ गावडे, विजय सरमळकर, मंगेश गावडे, सिद्धेश गावडे, रमाकांत गावडे यांच्यासह ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेअंती देऊळवाडी सडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद शाळा येथे संरक्षण भिंत उभारणे, धरम गावडेवाडी, भदगावडेवाडी, निळगावडेवाडी, गोवारर्टेंब रस्ता डांबरीकरण करणे, अणसुर पाल हायस्कूल समोरील रस्ता डांबरीकरण करणे ही कामे मंजूर करून निधी मिळावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, वेंगुर्ले भाजपा तालुका अध्यक्ष सुहास गवंडकर तसेच वसंत तांडेल बाबली वायंगणकर आदी यावेळी उपस्थित होते.