जोरदार घोषणाबाजीसह फटाक्यांची आतिषबाजी ; शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : भाजप नेते निलेश राणे यांचे मालवण शहर भरड नाका येथे शुक्रवारी सायंकाळी जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजीत भारतीय जनता पार्टीचा विजय असो… निलेश राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है… अश्या घोषणानी परिसर दुमदुमला. शेकडो गाड्यांचा ताफा ही यावेळी होता.
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचलक बाबा परब, उमेश नेरुरकर, अशोक तोडणकर, जेष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, गणेश कुशे, जगदीश गावकर, पंकज सादये, विलास मुणगेकर, प्रमोद करलकर, परशुराम पाटकर, संचालक केपी चव्हाण, संचालक आबा हडकर, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर, युवा मोर्चा शहरअध्यक्ष ललित चव्हाण, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सुमित सावंत, सुशील गावडे, निशय पालेकर, राज कांदळकर, नारायण लुडबे, राजा मांजरेकर यासह अनेक भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मालवण शहर भरड नाका येथे उपस्थित होते.