तुळस येथील दिक्षा तुळसकर यांचा “जिजाऊ पुरस्कार” ने सन्मान

Google search engine
Google search engine

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने कार्यक्रम

वेंगुर्ले : प्रतिनिधी
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त “जिजाऊ पुरस्कार'” यावर्षीही तुळस येथील दिक्षा दिनेश तुळसकर हीला सरपंच रक्ष्मी परब यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील अत्यंत गरीब कुटुंबातील गृहीणी, जिने काबाडकष्ट करून जागृती, कस्तुरी व विजय या तिन्ही मुलांचं पालनपोषण करुन, त्यांना कुठल्याही शिकवणीला न पाठवता घरीच अभ्यास घेऊन विविध स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी प्रवृत्त केले व त्यांना राज्यस्तरीय बक्षिसे मिळविण्यासाठी मेहनत घेतली. आई वडिलांनी शिवणकाम करून मुलांचे भवितव्य उज्वल बनविण्यासाठी काबाडकष्ट केले. त्यांच्या या मातृत्वाच्या प्रेरणेची दखल घेत ह्यावर्षीचा “जिजाऊ पुरस्कार” सौ.दिक्षा तुळसकर यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर हीने पुरस्कार देण्याबद्दल चे प्रयोजन व भाजपा करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेविका श्रेया मयेकर , महीला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर व रसिका मठकर, अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार, सुजाता पडवळ, माजी सरपंच शंकर घारे, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, तुळस उपसरपंच सचिन नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष मंदार तुळसकर, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, रुपेश कोचरेकर, शेखर तुळसकर, प्रथमेश सावंत इत्यादी उपस्थित होते.