गोवा विद्यापीठाच्या अध्ययन शाखेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हा दौरा : डॉ. संजीव लिंगवत

कोकण लोकसंस्कृती, लोककला व इतिहास साहित्य आणि संस्कृती याबाबत घेतली माहीती

वेंगुर्ले : दाजी नाईक l वेंगुर्ले येथे गोवा विद्यापीठाच्या अध्ययन शाखेतर्फे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व कोकण लोकसंस्कृती, लोककला व इतिहास साहित्य आणि संस्कृती या विषयावर वेंगुर्ले मालवण अभ्यास दौऱ्या निमित्ताने विद्यार्थी व प्राध्यापक यांनी वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार ला भेट दिली. यावेळी कोकण इतिहास परिषदचे सदस्य व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी इतिहासाबाबत माहिती दिली.

इ.स. १६७६ ते इ.स. १६७८ हि दोन वर्षे शिवराय, अष्टप्रधान मंडळ व महसूल प्रमुख अण्णोजी दत्तो यांनी वेंगुर्ले तील डच अधिकारी रोम्बाउट लेफर व अब्राहम लेफरब यांच्या सोबत व्यापारी हक्क कायम राखण्यासाठी वाटाघाटी केल्या त्या बदल्यात जपान वरुन आयात केलेले कैक टन तांबे स्वराज्य कार्यासाठी मराठ्यांना देऊन डचांनी शिवरायांच्या सहकार्याने व्यापारी हक्क कायम राखले व वेळोवेळी डच व्यापारी यांनी शिवरायांना नजराणा भेट दिल्याने शिवरायांनी डच यांना कौल देऊन डच यांना व्यापारासाठी संरक्षण दिले

छत्रपती शिवरायांनी इ स. १६६४ मध्ये वेंगुर्ले येथे कोकण मोहिमे प्रसंगी ठाणे उभारले असल्याचे इतिहासकार टॅव्हनिए लिहितात असं डॉ लिंगवत यांनी सांगितलं, तसेच वेंगुर्ले येथील वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार भेट देऊन या कोट बाबतीत संपूर्ण इतिहास कथन केला व वेंगुर्ले डच वखारीचे स्वराज्य स्थापनेसाठी केलेलं योगदान स्पष्ट केले.

दरम्यान विद्यार्थी व प्राध्यापक यांनी वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील मीठाचा सत्याग्रह ठिकाण, वि. स. खांडेकर स्मारक, वि.स. खांडेकर निवास, साहित्यिक जयवंत दळवी निवास, रेडी यशवंत गड, उभादांडा येथील कवी मंगेश पाडगावकर यांची शाळा, प्राचीन सागरेश्वर मंदिर शिलालेख, कुडाळ येथील कळसुत्रीई बाहुल्या खेळ, मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथे भेट देऊन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्याशी लोककले बाबतीत माहिती घेतली.

गोवा विद्यापीठाच्या मराठी अध्ययन शाखेचे संचालक

डॉ.विनय मडगांवकर, सचिन दळवी, निर्भिड पोलिस टाईम्स् सिंधुदुर्ग संपादीका सिमंतीनी मयेकर, शिरोडा बावडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश सुकी, नानोस उपसरपंच सागर नाणोसकर, गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. हेमंत अय्या,

प्रा. पूर्वा वस्त, प्रा. जयेश गावकर, लोक कलाकार चेतन गंगावणे, अथर्व बापट आदी यावेळी उपस्थित होते.