वेंगुर्लेत “गरुडझेप महोत्सव” अंतर्गत आयोजित मोफत आरोग्य शिबिराला प्रतिसाद..

Google search engine
Google search engine

शिबिरात 180 रुग्णांनी घेतला सहभाग

वेंगुर्ले : प्रतिनिधी
जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा वेंगुर्ला आयोजित “गरुडझेप महोत्सव 2023” अंतर्गत वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे अथायु मल्टीपेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे 180 रुग्णांनी सहभाग घेतला.
वेंगुर्ले येथील या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी वेंगुर्ले नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ, भाजपाचे वेंगुर्ले तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, अथायु मल्टीपेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉ. अनुजा पाटील, डॉ. रवि कुमार, डॉ. प्रल्हाद मणचेकर डॉ. स्वप्नाली माने-पवार, डॉ. जाई नाईक, डॉ. अभिजीत वनकुंद्रे, सामाजिक कार्यकर्ते सतीश डुबळे, सुनील परब, डॉक्टर सुप्रिया रावळ आदीं मान्यवरांचा समावेश होता.

या आरोग्य शरीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. प्रल्हाद मानकर व अथायु क्त मल्टीपेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूरच्या डॉ. अनुजा पाटील यांनी “जबरदस्त” या मंडळांने जनतेसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी डॉक्टर अनुजा पाटील व डॉक्टर प्रल्हाद मंचेकर यांचा मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. या आरोग्य शिबिरात हृदयविकार, स्त्रीरोग, हाडांचे विकार, मूत्ररोग, मधुमेह, रक्तदाब व ई.सी.जी. यांची तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. सदर आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले मधील पी. एफ. डिसोजा, एस. पी. पेडणेकर, एस. एस. पुराणिक, अभिजीत चव्हाण, अथायु मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोल्हापूर मधील स्टाफनर्स धनश्री कांबळे, वंदना पांचाळ, कोमल बुवा, उमेश पाटील,उदय सूर्यवंशी यांनी तसेच जबरदस्त कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ राऊळवाडाचे अध्यक्ष संभाजी राऊळ, तसेच मंडळाचे कार्यकर्ते मंगेश परब, सिद्धेश रेडकर, विजय आंदुर्लेकर, अनंत रेडकर, कौशल मुळे, स्वाती पाटकर, प्रांजल वेंगुर्लेकर, सागर शिरसाट, बबन आंदुर्लेकर, शिवाजी राऊळ, चिंटू राऊळ, संजय भाटकर, यशवंत किनळेकर, शेफाली खांबकर, मनाली रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, विवेक राऊळ, नाथा बोवलेकर, निल नांदोडकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते काका सावंत यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत जबरदस्त कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.