राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांचे यश.

कणकवली : विद्यार्थ्यांना विविध प्रकारे विकासपूर्ण व गुणवत्तायुक्त शिक्षण देत असणाऱ्या कणकवलीतील ‘पोदार इंटरनॅशनल स्कूल’ मधील विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे’ यांच्यामार्फत 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी)परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय संपादन करत शाळेच्या प्रगतीत आणखी मोलाची भर टाकली आहे. या परीक्षेत शाळेतील विद्यार्थी शौनक राजेंद्र जातेकर याने ग्रामीण सर्वसाधारण गटात 83.89 %गुण मिळवले तर शहरी सर्वसाधारण गटात अद्वैत किशोर गवस याने 80.89 %गुण मिळवत पात्र ठरले. त्याचबरोबर प्रथमेश प्रकाश पवार या विद्यार्थ्याने देखील शहरी सर्वसाधारण गटात 79.86% गुण मिळवत यश प्राप्त केले.शाळेचे पालक ,विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ.स्वाती कणसे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.