श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता खेळी मंडळाचा उपक्रम
चिपळूण | वार्ताहर : तालुक्यातील बामनोली येथील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर बामनोली या मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्घाटन रविवार दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता बामनोली गवळवाडी स्टॉप येथे होणार आहे. श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर बामनोली या मंदिराची नूतन वास्तू सण 2013 मध्ये बांधून झाली. त्यानंतर विविध कार्यक्रम नेहमीच मंदिरामध्ये साजरे होतात. मात्र या मंदिराचे सुबक प्रवेशद्वार बांधण्याचा हेतू अनेक ग्रामस्थांच्या मनामध्ये होता. या प्रवेशद्वार बांधण्याच्या संकल्पनेला श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता खेळी मंडळ बामनोली यांनी प्रत्यक्षात बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला. याकामी उभळे गावचे सुपुत्र सतीश (काका) चव्हाण आणि शिवसेना चिपळूण तालुका युवासेना उपतालुकाप्रमुख प्रीतम वंजारे यांच्या प्रयत्नातून हे प्रवेशद्वार बामनोली गवळवाडी स्टॉप येथे बांधण्यात आले आहे. या प्रवेशद्वारासाठी सर्व देणगीदारांनी सुद्धा आपली मोलाची मदत केलेली आहे. याच प्रवेशद्वाराचे उद्घाटन रविवार 15 जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. त्यानंतर ५ ते ६ वाजता मान्यवरांचा सत्कार, सायंकाळी ६.३० वाजता हळदी कुंकू समारंभ आणि रात्री १०.३० वाजता करमुनुकीचा कार्यक्रम म्हणून श्री भराडेश्वर नमन नाट्य मंडळ वहाळ भराडवाडी यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या प्रवेशद्वार उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व भाविक, ग्रामस्थ, मुंबई मंडळ, महिला मंडळ यांनी उपस्थित राहावे अशी विनंती श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता खेळी मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.