लता लॉज हॉटेलचे मालक शंकर वाळके यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी बाहेरचावाडा येथील रहिवासी व शहरातील प्रसिद्ध लता लॉज हॉटेलचे मालक
शंकर उर्फ दत्ता शांताराम वाळके (७२) यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. शहरातील प्रतिथयश व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती. सावंतवाडी अर्बन बँकमध्ये देखील त्यांनी सुरुवातीच्या काळात काही वर्ष सेवा बजावली होती. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. शुक्रवारी रात्री उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
लक्ष्मी इलेक्ट्रिकल्सचे मालक अमित वाळके यांचे ते वडील होते.