केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ. नितेश राणे यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
वैभववाडी | प्रतिनिधी : शिराळे येथे नव्याने मंजूर झालेल्या बीएसएनएल टॉवरचा भूमिपूजन सोहळा कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडला. या बीएसएनएल टॉवरचा फायदा खोरीतील बहुतांश गावांना होणार असल्यामुळे ग्राहक व नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. भुमीपूजन सोहळ्यानंतर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले. यावेळी वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, राजेंद्र राणे, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, कुमारी पाटील व शिराळे गावातील ग्रामस्थ तसेच डोंगरी धनगर विकास मंडळ तांबळघाटी, सडूरे व शिराळेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.