इन्सुली उपसरपंचपदी भाजपचे कृष्णा सावंत विजयी

सहा विरुद्ध चार मतांनी विजय

आमदार नितेश राणेंकडून अभिनंदन

बांदा : प्रविण परब

इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे कृष्णा सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी आघाडीच्या सौ. आरती परब यांचा सहा विरुद्ध चार मतांनी पराभव केला. आघाडीचे एक मत अवैध ठरले. कणकवली मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी उपसरपंच सावंत व भाजप पदाधिकार्‍यांचे फोनवरुन अभिनंदन केले.

इन्सुली उपसरपंच पदावर यापूर्वी सेनेचे रामचंद्र चराटकर होते. पक्षीय धोरणानुसार त्यांनी महिनाभरापूर्वी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकीय घडामोडीत सेनेचे तत्कालिन ग्रा. पं. सदस्य कृष्णा सावंत यांनी १५ दिवसांपूर्वी आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीत भाजपचे ६ तर आघाडीचे ५ सदस्य असे बलाबल झाले होते.

आज इन्सुली ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. भाजपतर्फे कृष्णा सावंत तर आघाडीतर्फे सौ. आरती परब यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. निवडणूक प्रक्रिया होऊन कृष्णा सावंत यांना ६ तर सौ. आरती परब यांना ४ मते पडली. त्यामुळे सावंत यांचा २ मतांनी विजय झाला.

जि. प. माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर व माजी पं. स. सभापती सौ. मानसी धुरी यांनी नवनिर्वाचित उपसरपंच कृष्णा सावंत यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, जिल्हा ओबीसी सेल सचिव विकास केरकर, ग्रा. पं. सदस्य दत्ता खडपकर, सौ. वर्षा सावंत, स्वागत नाटेकर, सौ. नमिता नाईक, सौ. राधिका देसाई, ज्ञानेश्वर राणे, महेश धुरी, साबाजी परब, महेंद्र पालव, रवी परब, सचिन दळवी, विवेकानंद नाईक, प्रकाश आईर, हरिश्चंद्र तारी, औदुंबर पालव, बापू कोठावळे, प्रदिप सावंत, प्रताप सावंत आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.