War: हमास-इस्त्रायल युद्धात आतापर्यंत ९००० मृत्यूमुखी, नेतन्याहू म्हणाले, ही स्वातंत्र्याची लढाई

गाझा: गेल्या तीन आठवड्यांपासून इस्त्रायल आणि हमास एकमेकांवर बॉम्बहल्ले करत आहेत. या युद्धात मरण पावलेल्यांची संख्या ९००० पार गेली आहे. अशातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की या युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान, हा टप्पा नक्कीच मोठा आणि कठीण असेल मात्र आमचे सैन्य मागे हटणार नाही. ही तर फक्त सुरूवात आहे.

नेतन्याहू यांनी गाझावर केलेल्या भारी बॉम्बहल्ल्याबाबत शुक्रवारी इस्त्रायलचे सैन्य गाझात घुसल्याची माहिती दिली. या युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली आहे. याचे लक्ष्य हमासच्या सैन्याला उद्ध्वस्त करणे आणि बंदी बनवलेल्या आमच्या नागरिकांना सुरक्षित परत आणणे आहे. आम्ही ग्राऊंड ऑपरेशनचा विस्तार करण्याचा निर्णय वॉर कॅबिनेट आणि सिक्युरिटी कॅबिनेटच्या बैठकीत सर्वसंमतीने घेतला आहे. आम्ही संतुलितपणे हा निर्णय घेतला आङे.

नेतन्याहू म्हणाले, आमचे कमांडर आणि जवान शत्रूच्या भागात जाऊन लढत आहे. मात्र त्यांना माहीत आहे की त्यांचे सरकार आणि जनता त्यांच्यासोबत आहे. आमचे सैन्य जबरदस्त आहे. यात एकाहून एक शूरवीर जवान आहे. गाझावर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याक मृत्यूमुखी पडलेलल्यांती संख्या वाढून आता ७७०३ झाली आहे. यात आतापर्यंत १४०० इस्त्रायलच्या लोकांचा मृत्यू झाला आहे.

ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई

नेतन्याहू म्हणाले, गाझाची ही लढाई दीर्घकाळ आणि कठीण प्रसंगांनी भरलेली असणार आहे. यासाठी आम्ही तयार आहोत. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आम्ही लढू. आम्ही लढत राहू आणि मागे हटणार नाही. आम्ही जमीन, समुद्र आणि हवेशी लढणार आहे. आम्ही जमिनीच्या वर आणि जमीनीच्या आतून शत्रूला संपवू.