पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे यांची उपस्थिती!
सिंधनगरी | प्रतिनिधी :
कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सन 2016 मधील जिल्ह्यातील त्या 7564 शेतकऱ्यांच्या प्रश्नात आमदार नितेश राणे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातले आहे. या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळावा म्हणून सिंदूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुढाकाराचे पाऊल उचलले आहे. यासंदर्भात 17 जानेवारीला मुंबई मंत्रालयात एक बैठक होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी शुक्रवारी दिली.
31 मार्च 2016 झालेल्या कर्जमाफीच्या निर्णयात सेंद्रिय जिल्ह्यातील 7564 शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित राहिले होते. 13 फेब्रुवारी 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय जाहीर केला होता. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून पाठपुरावा केला होता. मात्र नंतर आलेल्या आघाडी सरकारच्या काळात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. म्हणूनच तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनस्तरावर लक्ष वेधण्यासाठी 17 जानेवारी रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे.
या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा घेतलेल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी जिल्हा बँकेने सातत्याने पाठपुरावा केला आहे. या शेतकऱ्यांना या कर्जापातीचा लाभ मिळावा म्हणून आग्रहाचे प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यावेळी स्पष्ट केले.