दापोली l प्रतिनिधी: रत्नागिरी जि.प.प्राथमिक शिक्षक पतपेढीची पंचवार्षिक चार नोव्हेंबर रोजी होत असून,१६ जागांसाठी दुरंगी लढत ठाकली आहे.
सदर निवडणूकीत सर्वत्र महायुती पॅनेलचे वर्चस्व दिसून येत असून आज दापोली येथे महायुती पॅनेल मार्फत विराट दुचाकी रॅली काढणेत आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,अखिल भारतीय शिक्षक संघ,उर्दू शिक्षक संघटना,पदवीधर शिक्षक संघटना,केंद्रप्रमुख आदि.संघटनेच्या सुमारे २०० दुचाकीवरुन रॅली काढणेत आली. यावेळी महिला शिक्षिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
महायुतीची टेबल ही निवडणूक निशाणी असून टेबल या चिन्हावर शिक्का मारुन बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन तालुका उमेद्वार अशोक मळेकर यांनी केले.