संगमेश्वर येथे जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने मातीचे किल्ले बनवणे तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन

चिपळूण ( वार्ताहर) : जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने संगमेश्वर येथे तालुकास्तरीय गड-किल्ले संवर्धन या उद्देशाने मातीचे किल्ले बनवणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ९ नोव्हेंबर पासून दिवाळी सण संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो.आणि शालेय प्रथम सत्र पार पडल्यानंतर वेध लागतात.

दिवाळी सुट्टी हा शाळेतील मुलांसाठी आनंदाची एक पर्वणीच असते,या सुट्टीमध्ये मुलांना निसर्गाविषयी व ऐतिहासिक वास्तू यांचे जतन व संवर्धन कसे करावे याविषयी जनजागृती व्हावी व मुलांना शिवकालीन गडकिल्ल्यांची माहिती जाणून घेण्याची आवड निर्माण व्हावी याकरता जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने संगमेश्वर येथे तालुकास्तरीय गड-किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण प्रथम पाच क्रमांक काढण्यात येणार आहेत आणि इतर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे,जिव्हाळा फाउंडेशनचे संस्थापक प्रा.शांताराम आंग्रे व या संस्थेचे अध्यक्ष शैलेश गायकर यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा व आपले अंगीक कौशल्यकला जोपासावी असे आवाहन करण्यात केले आहे. स्पर्धकांनी नाव नोंदणी 9 नोव्हेंबरपर्यंत करुन घ्यावी.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.शांताराम आंग्रे,शैलेश गायकर,संभाजी धुमक,उदय गावडे,दिलीप नाचरे,सचिन मटकर हे काम पाहणार आहेत आणि या स्पर्धेचा निकाल मंगळवार दि.14 नोव्हेंबर दिवाळी पाडवा यादिवशी प्रदर्शित केला जाईल.आणि एका कार्यक्रमाचे औचित्य साधून विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल याची सर्व पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी उदय गावडे-9082396472, दिलीप नाचरे-8104022906, प्राजक्ता पवार-9137171187 यांच्याशी संपर्क साधावा