सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ आणि बीएसएनएलचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघ आणि बीएसएनएल यांच्या संयुक्ता विद्यमाने १७ जानेवारी रोजी सावंतवाडी सालईवाडा येथील कार्यालयात बीएसएनएलच्या जिल्हयातील ग्राहकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त बीएसएनएल ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रंबधक रविकिरण जन्नू यांनी केले. सावंतवाडी येथील बीएसएनएलच्या कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी अध्यक्ष नितीन वाळके, नितीन तायशेटये, नंदन वेगुर्लेकर, सुनिल सुर्यवंशी, सुधीर देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. जन्नू म्हणाले, १७ जानेवारी रोजी होणार्या ग्राहक मेळाव्यात जिल्ह्यातील ग्राहकांकडुन प्राप्त झालेल्या तक्रारींवर विचार मंथन होणार आहे. त्यानंतर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहणार्या ग्राहकांनी आपल्या तक्रारी लिखीत स्वरुपात देणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकरपारकर म्हणाले, या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात दिडशे ते दोनशे ग्राहक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी आणि त्यात झालेल्या चर्चेअंती प्रश्न सुटण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी कोल्हापुर कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अरविंद सावंत हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बीएसएनएलच्या सद्यपरिस्थिती बाबत श्री. जन्नू यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत आम्ही एक नंबरवर सेवा देत आहोत. सद्यस्थितीत आमच्याकडे साडे चार लाखापेक्षा जास्त मोबाईल धारक, आठ हजार बॉन्ड ब्रॅण्ड ग्राहक आहेत. लॅडलाईनचे ग्राहक कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांना बॉन्डबॅन्डकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुर्तास आमच्याकडे फक्त ४५ कर्मचारी व अधिकारी काम करीत आहेत. कार्यालयात ठेकेदारी पध्दतीवर काम करणारे फक्त सहा कर्मचारी आहेत. अन्य कर्मचार्यांना कमी करण्यात आले आहे. तर टॉवर तसेच टेलिफोन दुरस्तीची कामे कंत्राटी पध्दतीवर ठेकेदार नेमून करुन घेत आहोत.