सावरकर नाट्यगृह येथे दोन दुचाकींच्या अपघातात एकजण गंभीर जखमी

रत्नागिरी ः प्रतिनिधी : बेदरकारपणे दुचाकी चालवून दुसर्‍या दुचाकीला धडक देत अपघात केला.यात त्या दुचाकीवरील तरुणाला गंभिर दुखापत झाली असून ही घटना रविवार 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.15 वा.सावरकर नाट्यगृह ते लोटलीकर हॉस्पिटल जाणार्‍या रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी साईराज रमेश भाटकर (रा.एमआयडीसी,रत्नागिरी) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या अपघातात अफान अब्दुल्ला फक्रुद्दीन मुल्ला (22,रा.मजगाव रोड,रत्नागिरी) याला गंभिर दुखापत झाली आहे.याबाबत त्याचा भाउ फारुख मुल्ला (24) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,रविवारी दुपारी त्याचा भाउ अफान हा आपल्या ताब्यातील बुलेट दुचाकी घेउन सावकरकर नाट्यगृह ते लोटलीकर हॉस्पिटल मधील रस्त्यावरुन जात असताना साईराज भाटकरने त्याच्या दुचाकीला धडक देत अपघात केला.यात अफान गाडीवरुन खाली पडून त्याच्या उजव्या पायाला फॅ्रक्चर झाले आहे.हा अपघात केल्यानंतर साईराज तिथून निघून गेला होता.याप्रकरणी त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम 279,337,338 मोटार वाहन कायदा कलम 184,134/187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.