भोके ते फणसवळे वाहणार्‍या नदीच्या बंधार्‍यात आढळला अज्ञात प्रौढाचा मृतदेह

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील भोके ते फणसवळे वाहणार्‍या नदीच्या बंधार्‍यात अज्ञात प्रौढाचा मृतदेह आढळून आला.ही घटना रविवार 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.30 वा.सुमारास उघडकीस आली.
याबाबत खबर देणार यांना गावातील सुरेश कृष्णा शिंदे यांनी फोन करुन याबाबत माहिती दिली.त्यानुसार,रविवारी सायंकाळी त्यांना या नदीच्या माणकरी ढव धरण/बंधार्‍यात एका प्रौढाचा विवस्त्र आणि कुजलेल्या अवस्थेत दिसून आला.याबाबत गावातील सरपंच आणि इतर ग्रामस्थांनी तो मृतदेह पाहिल्यानंतर गावातील परिचयाचा नसल्याने ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.