चांदोर येथील नदीच्या डोहात मासे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील चांदोर येथील नदीच्या डोहात मासे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.अपघाताची ही घटना रविवार 29 ऑक्टोबर रोजी स.11 वा.घडली.
दिवाकर शंकर कालकर (48,रा.चांदोर गोताडवाडी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचो नाव आहे.याबाबत त्याच्या भावाने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानुसार,दिवाकरला दारुचे व्यसन होते.तसेच नदीतील मासे पकडण्याचा छंद होता.रविवारी सकाळी तो गोताडवाडी येथील गणपती विसर्जन करण्याच्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी गेला होता.तो दारुच्या नशेत असल्याने त्याचा पाय घसरुन तो नदीच्या डोहात पडल्याने पाण्यात गुदमरुन त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.