अनधिकृत वाळू वाहतूक प्रकरणी पाचव्या ट्रकवर देखील दंडात्मक कारवाई

१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ; तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची माहिती

कणकवली : अवैध वाळू वाहतूकप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच डंपर पैकी चार डंपरवर रविवारी ६ लाख २ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. पाचवा ट्रक उशिरा पोलीस प्रशासनाकडून ताब्यात मिळाल्याने त्यावर उशिरा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी दिली होती.

त्याचप्रमाणे सोमवारी त्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. तर त्यावर १ लाख ५५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.