सीईटीपीतून खाडीमध्ये येणाऱ्या पाईपलाईनलाच बुच मारो आंदोलन करण्याचा निर्णय
चिपळूण | प्रतिनिधी : लोटे औद्योगिक वसाहतीतून होत असलेल्या सांडपाण्याचा त्रास दाभोळखाडीतील माछीमार समाजाला भोगावा लागत आहे. याबाबत सातत्याने बैठका घेतल्या जत असल्या तरी अधिकारी या विषयाबाबत गंभीर नाहीत. जुलै महिण्यातील बैठकीचे इतिवृत्त दोन महिन्यांनी देताना त्यावर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत एमआयडीसाया निषेधाचा ठराव मांडण्यात आला. तसा सीईटीपीतून खाडीमध्ये येणाऱ्या पाईपलाईनलाच बुच मारो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोटे सीईटीपीतून होत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर गुहागर तालूक्यातील वेलदूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दाभोळखाडी संघर्ष समिती बैठक समितीचे अध्यक्ष संजय जुवळे, ज्येष्ठ सल्लागार बावा भालेकर, उपाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, दिनकर पारधी, अनिल खडपेकर, सचिव दिलीप दिवेकर, उपसचिव संतोष बंदरकर, सदस्य सुरेश जाधव, केशव सैतवडेकर, राम डांगे, भाऊ मिशाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत यापुर्वी २९,३० जुलै रोजी खाडीमध्ये झालेल्या प्रदूषणानंतर समिती एमआयडीसी, एमपीसीबी, सीईटीपी आणि मत्स्यविभाग अशी संयुक्त बैठक २९ ऑगस्ट रोजी एमआयडीसीच्या खेर्डी कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीमध्ये एकूण १६ विषयावर चर्चा करून सर्व विभागाने सहकार्याचे आश्वासन दिले होते. परंतु सदर बैठकीचे इतिवृत्ताची प्रत मिळविण्यासाठी एमआयडीसीच्या चिपळूण कार्यालयात वारंवार प्रत्यक्ष जाऊन देखील ते देण्यात येत नव्हते. त्यामुळे प्रसंगी स्मरण पत्र २५ ऑक्टोबरला इतिवृत्ताची प्रत देण्यात आली. मात्र या इतिवृत्तावर उपस्थित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाही.