चिपळूण | प्रतिनिधी : चिपळूण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अडरे मांडवखरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नुकतीच सौ. संजना सुधीर कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची ही निवड उर्वरित अडीच वर्षांसाठी करण्यात आली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत अडरे मांडवखरी गावच्या सरपंच व उपसरपंच यांचा पहिल्या टप्प्यातील अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुनश्च दोन नवीन चेहऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने संधी देण्यात आली आहे. त्यानुसार काही दिवसापूर्वीच सरपंचपदी सौ दीक्षा कांबळी यांची निवड करण्यात आली होती. तदनंतर आता (२३ ऑक्टो. रोजी ) उपसरपंचपदी सौ संजना सुधीर कदम यांची उर्वरित अडीच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे .
यावेळी सरपंच सौं. दिक्षा कांबळी, ग्रा प सदस्य वनिता कदम, रिचा कदम, सोनाली पिंपरे, शंकर कांबळी, रवींद्र कवलकर, रघुनाथ मुकनाक, शशिकांत कवडे, माजी उपसभापती सूर्यकांत खेतले, पोलीस पाटील सुभाष कदम, शाखा प्रमुख शशिकांत बाबाजिराव कदम, माजी शाखा प्रमुख सुधिर रामचंद्रराव कदम, ग्रामस्थ विजय रामचंद्रराव कदम, दिलीप कदम, जिवाजी कांबळी, विजय शांतारामराव कदम, सदाशिव कदम, समिर कदम, शशिकांत शिवाजीराव कदम, विजय शांतारामराव कदम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत कदम, मनोहर कदम, श्रीकांत कदम तसेच महिला सपना पास्टे, मानसी कदम, वृषाली कदम ,शेवन्ता कदम, नारायण शिंदे असे असंख्य हितचिंतक उपस्थित राहून उपसरपंच यांचे हार्दिक स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.