सामान्य जनतेची साथ, हाच माझा विश्वास! ही साथ कायमची हवी!!

आमदार शेखर निकम यांची दादर येथील मेळाव्यात भावनिक साद

चिपळूण | संतोष सावर्डेकर : आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने आमदार झालो अन महामारी, नैसर्गिक आपत्ती, राजकारणातील विचित्र होणा-या घडामोडी यामुळे विकास कामे करताना खुप अडचणी आल्या. त्यातून माझ्या परिने विकास कामे केली, आपल्याशी गाठी भेटी सुद्दा होत होत्या. मात्र, एकत्रित असा भेटण्याचा अन आपल्याशी विकास कामांबाबत बोलण्याचा व संवाद साधण्याचा योग येत नव्हता तो मेळाव्यात आला. मेळाव्यातील आपल्या बहुसंख्य उपस्थितीने आपले प्रेम अनुभले. कोणत्याही आमदारास जेवढे प्रेम मिळत नसेल तेवढे प्रेम मला आपल्या कडून मिळत आहे, यांचे मला समाधान वाटले, असे प्रतिपादन मुंबई दादर येथील कडवई जिल्हा परिषद गट व मुचरी पंचायत समिती गण मेळाव्याप्रसंगी केले.

कडवई जिल्हा परिषद गट येथे ५६ कोटी ८० लाख २५ हजार व मुचरी पंचायत समिती गण येथे रु. २६ कोटी ३९ लाखाचा निधी मिळाला आणि जो आपला विकास झाला. तो प्रत्येक कार्यकर्ता शेखर निकमांमुळे झाला असे म्हणत आहेत. मात्र हा विकास माझ्या एकट्यामुळे झाला नसून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला आहे आणि म्हणूनच अजितदादा पवार यांना आपण सर्वानीच कायम साथ देणे क्रमप्राप्त आहे. काही लोक म्हणतात काहीही बोलत आहेत. तस काही नसुन हा जो काही मी निर्णय घेतला तो माझ्या स्वत:साठी नसून जनतेच्या अन मतदार संघाच्या विकासाठी आहे हे तुम्ही सर्व जाणून आहात, असे यावेळी आ. निकम यांनी स्पष्ट केले.

रस्ते, पाखाड्या झाल्या म्हणजे विकास झाला असं नाही तर शेती व पर्यटन यांचा विकास करत या माध्यमातून युवकांना नोकरी धंदे निर्माण करुन रोजगार निर्मिती झाली तरच विकास झाल्याचे सार्थक होईल. त्यामुळे गावातील लोकांनी आपल्या जमिनी विकुन आपल्याच पायावर धोंडा मारुन घेऊ नका. पाणी टंचाईसुद्धा पुर्णपणे नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासाठी छोटे-छोटे बंधारे बांधणे व तालुकास्तरीय छोट्या छोट्या बधा-याची दुरुस्ती करणेसाठी पाठपुरावा चालू आहे. सर्व गोष्टी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण पुर्ण करुन घेऊ शकतो आणि आपण हा विकास आगामी काळात निश्चित करु, असेही यावेळी सांगितले.

सांस्कृतिक, क्रिडा व शिक्षण क्षेत्रात आपणास जिथे जिथे अडचणी येतील तिथे मार्गदर्शकाप्रमाणे उभा राहुन आपणास मोलाचे सहकार्य करेन. समाजात वावरताना एकमेकांशी राजकीय मतभेद ठेवू नका. कारण ज्यांच्यासाठी तुम्ही करता ते काही मिनीटातच एकत्र चहापान करतात. माझा आजही कोणीही मोठा राजकीय मार्गदर्शक नेता नाही आणि कालही नव्हताच. ‘सामान्य जनतेची साथ, हाच माझा विश्वास….आणि ही साथ कायमची हवी आहे, अशी भावनिक साद घातली.

प्रदेश सरचिटणीस दिनकर तावडे म्हणाले की, एखाद्या आमदाराने जि.प. गटासाठी कोट्यवधी पेक्षा जास्त निधी खर्च करणारे आमदार शेखर निकम हे महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार असतील. राजकारणात नम्र असून मृदूभाषी आहेत. प्रत्येकाला आपलंस वाटणारे नेतृत्व आहे. अजितदादा यांचे जवळचे व आवडते आमदार आहेत. मतदारसंघाचा विकास करावयाचा असेल तर उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत त्यांना साथ देणे गरजेचे आहे असे मला वाटते.

मुंबईस्थित चाकरमान्यांनी म्हणाले प्रत्येक माणसाच्या हृदयात वेगळे स्थान व आपुलकीचे स्थान निर्माण करणा-या आमदार शेखर निकम यांना कायम खंबीरपणे साथ देऊया असे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, माजी सभापती सौ. पुजा निकम, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक राजेंद्र सुर्व, राष्ट्रवादी काँग्रेस संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, संघटक बाळूशेठ ढवळे, युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, नितीन भोसले, बाळा पंदेरे, मंगेश बांडागळे, गणपत चव्हाण, सुबोध चव्हाण, तुकाराम येडगे, आण्णा पांचाळ (सायले), सुनिल कदम (फणसवळे), संतोष कांबळे (मुचरी), सिद्धार्थ सावंत (तांबेडी), संतोष घाग (काटवली), दत्ताराम शेळके (धनगर समाज अध्यक्ष), जयेश गोमाणे, संदिप मोरे, विजय घोरपडे, विजय साळुंखे, बाळकृष्ण ब्रीद, बापू ओकटे, राजू पवार, अनिल चव्हाण (शृंगारपूर), अशोक घोसाळकर, राजेंद्र ओकटे, अभय कदम (कडवई), आत्माराम करंडे, गणपत जाधव (गोळवळी), सुरेश डिके, मनोहर जाधव, बाबु हरेकर (तुरळ), हरिश्चंद्र पवार, चंद्रकांत भडवळकर (राजवाडी), महेंद्र मोहिते, विष्णू पंडव, विजय साळुंखे (चिखली), प्रदिप म्हादे (शेंबवणे), सिद्धार्थ सावंत, प्रशांत रागंणेकर (रांगव), चिंतामणी कदम (शेंनवडे), निलेश खताते (शिंदे अंबेरी), सुधाकर ब्रीद (मासरंग), अनिल पवार, मिलिंद पवार (धामणी), अनिल घोरपडे, अनंत पवार (कारभाटले), सुरेश साटले, रमेश पाले (तिवरे), विश्वास तावडे (नायरी), शिवराम धांगडे, अनिल चव्हाण (शृंगारपूर), रघुनाथ घडशी (निवळी), सुरेश धांगडे (कातुर्डी), शांताराम मालप (अणदेरी), रंगराव जाधव (पाचांबे), लहु उमासरे (हेदली), भगवान कदम (कुचांबे), गणेश येडगे (राजिवली), बाबाराव कोंडविलकर, श्रीपत सुर्वे, श्रीकांत साळवी (कुळ्ये), दत्ताराम घडशी, दिलीप धामणे (विघ्रवली), संतोष घाग (काटवली), विजय पांचाळ (सायले), प्रमोद खेडेकर, सिताराम मोहिते, रुपेश कांबळे (सोनवडे), आत्माराम भुरवणे (तेर्ये), प्रकाश सोनार (बोरसुत), सचिन गावडे, प्रमोद गावडे (वाशी तर्फे संगमेश्वर), राम पवार, राजू पवार, प्रदिप कांबळे (फणसवळे), शांताराम पवार (देवाळे), वसंत तटकरे, संतोष मोरे, मंगेश गोसावी, गिता मोरे, गंगाराम टोपरे (मुचरी) इ. कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सुर्वे, राजेंद्र पोमेडकर, संतोष भडवळकर, संकेत खामकर, विकास बेटकर, अनिल नांदळजकर, आण्णा पांचाळ, रघुनाथ भालेकर, महेश नांदळजकर, राजाराम गोवळकर, राजाराम इंदुलकर, सुभाष जाधव, राजेंद्र बोथरे, राजेंद्र घोसाळकर, सुधीर इंदुलकर, दीपक चव्हाण, अजय साबळे, बाबू इंदुलकर, सुभाष जाधव, विनोद कदम, रमेश डिके आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पोमेंडकर अन सूत्रसंचालन दीपक चव्हाण व महेश नादळजकर यांनी केले.