कणकवली I मयुर ठाकूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ल कणकवली पंचायत समिती येथील पत्रकार कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर झाली. त्यानंतर तालुकानिहाय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुका उमेश परब व उपाध्यक्ष पदी मयुर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव पदी रोहन पारकर यांची नियुक्ती केली. तर खजिनदारपदी जेष्ठ पत्रकार आनंद तांबे यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी विराज गोसावी यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग उपाध्यक्ष समिल जळवी, सचिव शिरीष नाईक, खजिनदार संजना हळदिवे, सहखजिनदार संजय भाईप, सदस्य मिलिंद धुरी, आनंद कांडरकर आदि सदस्य तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते.